सळपातळ शरीरयष्टीसाठी

ND
सुंदर व सळपातळ शरीरयष्टी कुणाचेही लक्ष वेधून घेते. नाजूक कंबर व सपाट पोटासाठी म्हणूनच महिलावर्गात शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. केवळ तरुणाईच नाही तर वय झालेल्यांनाही शरीरयष्टी सुंदर व आकर्षक करण्याचे वेड लागले असते. उर्मिलाची 'पतली' कमर, शाहरुखची 'स्लीम पर्सनॅलिटी' व करीनाची झिरो फिगर यामुळेच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

पण लवकरात लवकर स्मिम बनण्याच्या स्वप्नामुळे खिशाला कशी चाट बसते याचा अंदाज देखील आपल्याला येत नाही. आपल्या स्वप्नांमुळे जिम्नॅशियम व योगा क्लास घेणारे मात्र चांगले हात धुऊन घेतात. मुळात या सगळ्यासाठी आधी जिभेवर ताबा हवा. अन्न जसे आपल्याला पोषक असते व तसे घातक ही ठरू शकते. चटपटीत पदार्थ खाताना आपला मनावरील ताबा सुटतो व जिभेचे लाड पुरवण्यासाठी आपण आपोआप त्या पदार्थांकडे ओढले जातो. त्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊन ते बैडोल होते.

आपण जे जगतो ते केवळ खाण्यासाठीच तर आहे, असे काहींचे या समर्थनार्थ म्हणणे असते. त्यामुळे त्यांना खाण्याची जेथे संधी मिळते ती ते साधून घेतात. या प्रकारात महिलाही अग्रेसर आहेत. आपल्या खाण्यावर आपण स्वतः: मर्यादा नाही घातली तर दर महिन्याला अर्धा पौंड वजन वाढते. पुरुषांचे वजन हे म्हातारपणात वाढते तर महिलांचे वजन हे प्रसूतीनंतरच्या काळात वाढते. यावेळी वजनावर नियंत्रण मिळविले तर शरीरावर होणार्‍या विपरित परिणामांपासून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो.

एक परदेशी वत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, 50 महिलाच्या मागे एक महिला तिच्या शरीरयष्टीपासून समाधानी आहे. 50 टक्के महिला त्यांचे वजन कमी सांगतात तर 60 टक्के महिला या त्यांच्या कपड्यावरील साइजचे लेबल देखील काढून टाकतात. पुरुषाचे प्रमाण ही असेच काहीसे आहे.

प्रत्येक जाड व्यक्ती हा सळपातळ होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसते. चुकीचा व्यायाम व डायटिंग आपल्या आरोग्यास हानीकारक ठरू शकते. त्यामुळे व्यायाम सुरू करण्याअगोदर फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्याचे उपाय :-
* आहार तज्ज्ञाकडून 'डाएट चार्ट' तयार करून घ्या.
* जेवण निर्धारित वेळेवर घ्या.
* जेवण केल्यानंतर तीन तासांच्या काळात काहीच खाऊ नका.
* रोज सकाळी उठून व्यायाम करा.
* आपले काम स्वतः:करण्याची सवय लावा.
* बाजारातील पदार्थ खाणे टाळावे.
* एका आठवड्यात एकदा तरी वजन करून पाहा.
* सॅलड व फळांच्या ज्यूसचे जास्तीत जास्त सेवन करावे.

वेबदुनिया वर वाचा