वय 35 आणि आत्मविश्वास!

जर तुम्ही वयाचे 35 वर्ष पूर्ण करून चुकले असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा चेहरा नेहमी ताजेतवाने दिसला पाहिजे तर खाली काही टिप्स दिल्या आहेत त्याचा वापर जरूर करून पाहा....

* सर्वप्रथमतर तुमच्या वयानुसार दिसायचा प्रयत्न करा, आपल्या वयाहून 10 वर्ष कमी दिसण्याचा प्रयत्न करणे बेकार आहे.

* ताजेतवाने राहण्यासाठी चेहऱ्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे. कडक उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन जरूर लावावे. सनस्क्रीन लोशनचा वापर पावसाळ्यात देखील करायला पाहिजे कारण या मोसमात अल्ट्रावायलेट किरणे अधिक निघतात ज्याने त्वचेला नुकसान होते.

* या वयात बीन मेकअपचे राहणे शक्य नाही आहे पण जास्त मेकअप करणे टाळावे, ते चांगले दिसत नाही. कलाकारांची नक्कल तर बिलकुलच करू नका.

* रात्रीचे जागरण या वयात डोळ्यांसाठी चांगले नसते ज्याने डोळ्याखाली काळे घेरे पडण्यास सुरू होतात. सिगारेटपासून दूर राहा याचा धूळ चेहऱ्यावर सुरकुत्या आणतो.

* आपल्या हेअरकटकडे लक्ष्य दिले पाहिजे. केस गळत असतील तर जास्त काळजी न करता लहान केस करून त्यांना चांगला लुक देऊ शकता.

* रात्री झोपण्या अगोदर रोज चेहरा धुऊन मॉइश्चरायझर जरूर लावावे. या सर्व गोष्टी नियमितपणे केल्या तर तुम्ही आत्मविश्वासाने भरून दिसाल.

वेबदुनिया वर वाचा