राग हा मेंदूतील विकार आहे. त्यामुळे क्षणातच त्याचे मानसिक संतुलन बिघडते. राग येणे हा स्वभावाचा भाग आहे. परंतु, तो सर्व मर्यादा ओलांडतो तेव्हा मात्र मनस्तापच सहन करावा लागतो.
राग हा अतृप्त व अपूर्ण इच्छांचा परिणाम आहे. अपेक्षाभंग झाल्यानंतर वैफल्य निर्माण होते. त्याचे रूपांतर संतापात होते. पण हा संताप स्वत:साठी तसेच दुसर्यासाठीही नुकसानदायक ठरू शकतो. मनात दाबून ठेवलेल्या रागाचा स्फोट होऊन बाहेर आल्याने मानसिक संतुलन बिघडून त्याच्या जीवावरही बेतू शकते. रागावर नियंत्रण राखण्यासाठी रागाचे मूळ कारण शोधून ते नष्ट केले पाहिजे.
रागावर नियंत्रण मिळवणाराच व्यक्ती यश संपादन करू शकतो. जीवनात येणार्या सुख- दु:खांना हसत हसत स्वीकारून जीवनाचा आनंद लुटू शकतो.
* रागावर नियंत्रण राखा.... राग शिगेला पोहचतो तेव्हा योग्य-अयोग्य गोष्टींचे भान रहात नाही. अशा स्थितीत व्यक्ती वेड्यासारखे करतो. रागावर नियंत्रण कसे राखावे, हे शिकले पाहिजे. कधी कधी व्यक्ती क्रोधाचा गुलाम बनून जातो. इच्छा नसतानाही तो इतरावर भडकतो. याच्या मागील कारण म्हणजे रागावर नियंत्रण राखता न येणे. आपल्याला राग येईल, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. दुःखद बाबीवर शांत डोक्याने विचार करून त्यावर योग्य मार्ग काढला पाहिजे. स्वभावात तसेच जीवनशैलीत परिवर्तन घडवून आणले पाहिजे.
रागावर नियंत्रण मिळवणाराच व्यक्ती यश संपादन करू शकतो. जीवनात येणार्या सुख- दु:खांना हसत हसत स्वीकारून जीवनाचा आनंद लुटू शकतो.
* राग आल्यावर.... राग येईल तेव्हा त्याने त्याचे लक्ष दुसर्या कामात वळवले पाहिजे. एखाद्या गोष्टी जास्त विचार केला तर व्यक्तीचे मानसिक संतुलान बिघडू शकते. अनेक प्रसंग राग उद्भवण्यास कारणीभूत ठरतात. अशा परिस्थितीत आपण आपले लक्ष इतरत्र वळविले पाहिजे. किंवा दुसर्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे रागावर बर्यापैकी नियंत्रण राखता येते.
कधी कधी वायफळ बडबडही राग येण्याचे कारण वनू शकते. त्यामुळे अशा चर्चेत सहभाग न घेणे योग्य असते. ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला चीड येते, त्यापासून तुम्ही जरा दूरच रहा.
रागावर नियंत्रण राखण्यासाठी आपल्या वागणुकीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. शांत डोक्याने विचार केला पाहिजे. आपल्याला राग कशामुळे आला आहे? हे समजून घेऊन त्या गोष्टीकडे लक्ष न देता मौन धारण केले पाहिजे. मौन हे असे शस्त्र आहे की, त्याने अनेक वादविवादांना मुळापासून नष्ट करता येते.