फेस पॅक लावा, सुंदर दिसा

WD
आजच्या धावपळीच्या काळात स्वत:कडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ मिळत नाही. तिथे त्वचेची काळजी घ्यायला कुठून वेळ मिळणार? असे असले तरी आठवड्यातून फक्त एक दिवस किंवा महिन्यात एकदाच थोडासा वेळ काढून स्वत:कडे लक्ष दिले तर तुम्हीही सुंदर दिसू शकता.

त्वचेच्या देखरेखीसाठी दिला गेलेला थोडासा वेळही तुमचे सौंदर्य वाढवू शकतो. म्हणूनच आम्ही येथे दिलेल्या टिप्सचा आवर्जून वापर करा आणि हो त्वचेसाठी फेस पॅक वापरलात तर उत्तमच. त्याचीच माहिती खाली दिली आहे.

कोमल त्वचेसाठी:
WD
संत्र्याचा पॅक:
संत्र्याची साले उन्हात वाळवून, मिक्सरमधून बारीक करून त्याची पूड बनवून घ्या. तयार केलेल्या पावडरीत 4-6 गुलाबाच्या सुकविलेल्या पाकळ्या, 1 चमचा मध आणि दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट 20 मिनिटे चेहर्‍यावर लावा. नंतर धुऊन घ्या.

सामान्य त्वचेसाठी फेस पॅक:
सफरचंदाचा पॅक:
प्रथम सफरचंद कापून मिक्सरमधून काढून घ्या. त्यात 1/2 चमचा लिंबूचा रस आणि दोन चमचे मध मिळवा. ही पेस्ट 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता हा पॅक तयार आहे लावण्यासाठी. तयार केलेला पॅक चेहर्‍यावर 30 मिनिटे लावा आणि धुऊन घ्या.

तेलकट त्वचेसाठी:
WD
काकडीचा पॅक:
काकडीचा पॅक बनविण्यासाठी काकडी, अंड्याचा पांढरा बलक, 1 चमचा लिंबूचा रस, पुदिन्याची पाने 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि धुऊन घ्या.

डाग असणार्‍या चेहर्‍यासाठी:
WD
टोमॅटोचा पॅक:
मिक्सरमध्ये 1 टोमॅटो, 1 चमचा जईचे पीठ 1 चमचा लिंबूचा रस घेऊन घट्ट होईल असे वाटून घ्या. हा पॅक 10 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि कोमट पाण्याने धुऊन घ्या.

थकलेल्या चेहर्‍यासाठी:
WD
पपईचा पॅक:
पपईच्या बिया काढून 2-3 स्लाइस घेऊन मिक्सरमध्ये 1/2 कप दह्यात वाटून घ्या. आता हा पॅक चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी धुऊन घ्या.

वरील टिप्स लक्षात घेऊन आपल्या त्वचेची काळजी घेतली तर निश्चितच तुमच्याकडून दिलेला थोडा वेळही तुम्हाला अजूनच सुंदर बनवेल.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा