फॅशनेबल स्लॅक्स, लेगिंग्ज व टी शर्टस् !

वस्त्रांच्या दुनियेत नवनवीन फॅशन सतत दाखल होत असतात. त्यातही तरुणाईला आकर्षित करणार्‍या फॅशन्स आणण्याचा उत्पादकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे हल्ली वस्त्रांच्या दुनियेत तरुणाईच्या पसंतीला चांगला वाव मिळतो. अशाच पद्धतीचे सध्या वेगवेगळ्या रंगांमधील, पॅटर्नमधील आणि डिझाईनमधील टी- शर्टस् तरुण-तरुणींचा आकर्षित करत आहेत.

जीन्स आणि टी-शर्ट हा पेहराव आरामदायी तर असतोच. शिवाय व्यक्तिमत्त्वाला उठावदार करतो. तरुणींसाठी हाफ स्लीव्हज, थ्रीफोर्थ, मेगा ‍स्लीव्हज, फूल स्लीव्हज अशा प्रकारांमध्ये विविध रंगाचे टी-शर्टस् उपलब्ध आहेत. याशिवाय गळ्यामध्येही व्ही नेक, बोननेक, राऊंडनेक अशा फॅशन्स पहायला मिळतात.

स्लॅकची फॅशनही नव्याने समोर येत आहे. शॉर्ट कुर्त्याबरोबर स्लॅक्स, लेगिंग्ज, टाईट्‍स घालण्याचा ट्रेंड आहे. हायवेस्ट कुर्ता आणि रोल्डअप स्लीव्हजबरोबर छानसा स्टोल शोभून दिसतो. या शिवाय गळ्याच्या व्ही नेक, स्वेअर नेक, राऊंड अशा विविध फॅशन्स उपलब्ध आहेत. कपड्याबाबत बोलायचे झाले तर प्युअर कॉटन आणि कॉटन मिक्स व्हरायटीही उपलब्ध आहे. टी शर्टसची व्हरायटी मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या किमतीत वैविध्य दिसते.

वेबदुनिया वर वाचा