फँसी आणि क्लासी फ्रिलचे ड्रेस!

जेव्हा लहानपणी तुम्ही फ्रिलचे फ्राक्स आणि स्कर्ट घालून ठुमकत ठुमकत चालत होत्या तसेच फ्रिलदार फ्रॉक, स्कर्ट आणि शर्ट सध्या चलनामध्ये आले आहेत. फ्रिलचे फ्रॉकतर मुली कॉर्पोरेट सूटसोबत घालणे पसंत करतात. कारण बोरिंग दिसणारे फॉर्मल सूट फ्रिलच्या फ्रॉकमुळे नवीन लुकमध्ये दिसतात.

फ्रिलच्या ड्रेसची सर्वातमोठी वैशिष्टयम्हणजे हे फेमिनीन लुक देतात आणि तुम्ही याला पार्टी वियर ते कॅज्युअल विअरपर्यंत घालू शकता. या प्रकारचे रफल्ड ड्रेस तुम्ही बऱ्याच डिझायनमध्ये तयार करू शकता. जसे रफल्ड रँप ड्रेस, सिंगल लेअर रफल्ड ड्रेस, टीर्ड रफल्ड ड्रेस.

रफल्ड ड्रेस स्टायलिश लुक तर देतातच त्याशिवाय तुमच्या बऱ्याच समस्यांचे निदान देखील करतात. जसे तुमची बस्ट लाइन स्मॉल असेल तर अशा ड्रेसची निवड करा ज्यात फ्रिल वरच्या बाजूस दिली असेल. आणि जर बस्ट लाइन हेवी असेल तर तुमच्यासाठी अशा प्रकारचे ड्रेस योग्य राहील ज्यात फ्रिल वर्टीकली स्ट्रेट लाइनमध्ये असेल. जर तुम्ही बॉडीच्या खालील भागाला हेवी लुक देण्याचा प्रयत्न करत असाल तर खालच्या बाजूला फ्रिल असलेले परिधान उपयुक्त ठरतील.

सध्या बॉलीवूडच्या अभिनेत्र्या देखील फ्रिलने सजलेले परिधानात दिसतात. मागील काही समारंभात दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा व प्रीती जिंटा फ्रिलचे ड्रेसमध्ये आल्या होत्या.

फ्रिलच्या ड्रेसमध्ये तुम्हाला ज्वेलरीची चिंता करण्याची गरज नसते. हे बीनं हेवी ज्वेलरीचेपण चांगले लुक देतात. फ्रिलदार ड्रेसला तुम्ही बऱ्याच डिझायन व मटेरियलमध्ये तयार करू शकता. हे हलके कपडे जसे जॉर्जेट, शिफॉन, कॉटन आणि सॅटिनमध्ये जास्त चांगले लुक देतात. तर मग आता पुढच्या पार्टीसाठी वेगळे दिसून येण्यासाठी एखादा फ्रिलचा ड्रेस स्वतः:साठी नक्कीच तयार करा.

वेबदुनिया वर वाचा