चाळिशीतही दिसा विशीतले

NDND
स्त्रियांनी चाळिशीनंतर त्वचा आणि मेकअप याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. वयातील वाढ आपण थांबवू शकत नाही. पण त्या वयाचे परिणाम आपण नक्कीच कमी करू शकतो. त्यासाठी महत्त्वाच्या काही टिप्स:

* चाळिशीनंतर त्वचा तेलकट व्हायला सुरुवात होते. वय वाढण्यासोबतच त्वचा शुष्क आणि रखरखीत व्हायला लागते. त्यामुळे चाळिशीवरील स्त्रियांनी मेकअप करताना मॉइश्चराइजर बेस फाउंडेशन आणि लिपस्टिकचा वापर करायला पाहिजे. फाउंडेशन लावण्याआधी मॉइश्चराइजर लावा. डोळ्यांच्या खाली व्हॅसलीन लावून ते टिशू पेपरने शोषून घ्या.

* काळ्या डागांवर कंसीलर मॉइश्चराइजर लावा.

* घट्ट आणि हेवी फाउंडेशनचा वापर करू नका. वरून पावडर फक्त थपथपवा. पावडर नाकाच्या जवळच्या चमकणार्‍या भागावर लावा. तरच मेकअप चांगला दिसतो.

* वय वाढताना त्वचा ओढलेली दिसते. म्हणून ब्लशचा वापर करू नका. लावायचेच असेल तर गालांवरील उंचवट्यांवर लावा. कानांच्या बाजूने लावू नका. याने चेहरा ओढलेला वाटणार नाही.

* लिपलाइनर नॅचरल रंगाचेच लावा. मेट लिपस्टिक लावण्यापेक्षा मॉइश्चराइजिंग लिपस्टिक किंवा लिप ग्लासचा वापर करा.

* डोळ्यांचा मेकअप भडक करू नका. पापण्यांवर आयलाइनर लावा. मस्काराचा वापर अवश्य करा. भडक आयलायनर लावू नये.

* आय ब्रो अवश्य लावा. पण तो फार पातळ करू नका. त्याने चेहर्‍याची उरली-सुरलेली कोमलता नाहीशी होईल.

लक्षात ठेवा मेकअप चेहरा चांगला दिसावा यासाठीच केला जातो.

वेबदुनिया वर वाचा