गर्भसंस्कार

गर्भ म्हणजे मातेच्या पोटातील जीव, गर्भाशयातील पिंड. गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थानाची शुध्दी होऊन गर्भधारणा सुलभ व्हावी म्हणून प्रथम रजोदर्शनानंतर जो संस्कार केला जातो तो. ज्याप्रमाणे बीज पेरण्या अगोदर जमिनीची योग्य पध्दतीने मशागत केली तरच चांगले पीक येऊ शकते तसे अगदी गर्भसंस्काराबाबत होत असते.

  शारीरिक व मानसिक एकरूपता साधण्यासाठी शक्यतो लग्नानंतर लगेच संतती होऊ देण्यापेक्षा एक ते दोन वर्ष पाळणा लाबंविला पाहिजे. कारण या एक तो दोन वर्षात त्यांनी एकमेकांना जाणून घेणे महत्त्वाचे असते.      
गर्भात वाढणार्‍या जीवावर उत्तम संस्कार, चांगला स्वभाव, तल्लख बुध्दी, चांगले आरोग्य लाभावे म्हणून पती- पत्‍नीकडून शारीरिक व मानसिक आवश्यक ती तयारी करणे गरजेचे असते. त्यासाठी अनुकूल वातावरण आणि परिस्थिती निर्माण करणेही आवश्यक आहे. यासंदर्भात नवविवाहित दाम्पत्याने अधिक सतर्क राहिले पाहिजे. दोन अनोळखी व्यक्ति एकत्र आलेल्या असतात. त्यांचा एकमेकांचा एकमेकावर प्रभाव पडून त्यांच्यात आकर्षण निर्माण झालेले असते. त्या वेळी ते वेगळ्या वातावरणात असतात. म्हणूनच शारीरिक व मानसिक एकरूपता साधण्यासाठी शक्यतो लग्नानंतर लगेच संतती होऊ देण्यापेक्षा एक ते दोन वर्ष पाळणा लाबंविला पाहिजे. कारण या एक तो दोन वर्षात त्यांनी एकमेकांना जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्यांच्यात होणार्‍या शारीरिक संबंधांना सुनियोजित व संतुलित कसे ठेवता येईल, याबाबत जाणीवपूर्ण लक्ष दिले पाहिजे.

गर्भसंस्कार ही आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नवजोडप्याने हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण आपल्या दोघांपासून तिसर्‍याची उत्पत्ती होणार आहे. त्यावर उत्तम संस्कार व्हावेत, त्याची बुध्दी तल्लख असावी, त्याचे स्वास्थ्य उत्तम असले पाहिजे म्हणून आधी ह्या गोष्टी ते पूर्ण करू शकतात काय, हे आधी लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय संस्कृतीनुसार स्त्री- पुरूषातील कामसंबंध तेव्हाच वैध, योग्य आणि नैतिक समजले जातात जेव्हा ते परस्पर विवाहीत म्हणजे पती पत्‍नी असतात. कामसंबंधांना मर्यादीत व सुदृढ ठेवण्यासाठी भारतीय संस्कृतीने वि‍वाहाला एका पवित्र संस्काराचे स्वरूप दिले आहे. म्हणून आपली शक्ती आणि आरोग्याचे रक्षण करत कामसंबंध प्रस्थापित करणे उचित ठरते. आपण हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, प्रत्येक वेळी होणारे कामसंबंध हे संतती उत्पन्न करण्याच्या उद्देशाने केले जात नाहीत. संतती उत्पन्न करण्याच्या उद्देशाने केल्या जाणार्‍या कामसंबंधामधल्या कार्यपध्दतीला व मानसिकेला बदलणे आवश्यक असते.

भारतीय संस्कृतीत मानवी जीवनाच्या कल्याणासाठी 16 संस्कार सुचविले आहेत. या संस्कारावरच मानवाच्या संपूर्ण जीवनाचा पाया रचला जात असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

वेबदुनिया वर वाचा