आजकाल लग्न असो वा इतर काही समारंभ मोठ्या उत्साहान पार पाडले जातात. अश्या समारंभासाठी छान ड्रेसअप केल्यानंतर प्रश्न येतो केसांना वेगळा लुक देण्याचा. आणि आपल्याला खूप काही निराळी हेअर स्टाइल सुचतं नसेल आणि झटपट केस छान पण दिसले पाहिजे अशी इच्छा असेल तर हेअर अॅक्सेसरीज हाच एक उत्तम पर्याय आहे. सध्या अनेक हेअर अॅक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बो, डिझायनर हेअर बँड्स
हेअरबँड
मेटालिक, गोल्डन, सिल्वर, ब्रास किंवा इतर कोणत्याही धातूचे ट्रेंडी हेअरबँड्स कोणत्याही इंडियन पेहरावावर चालतील.
प्रिंटेट किंवा एम्ब्रॉयडरी हेअरबँड
एथनिक लुक हवा असल्यास वर्क केलेले हेअरबँड्स वापरू शकता. हे जरा हटके दिसतात. याव्यतिरिक्त प्रिंटेट किंवा व्हेलवेटचे हेअरबँड्सही उत्तम पर्याय आहे.