आला पावसाळा मोबाईल सांभाळा

पावसाळ्यात इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांएवढीच मोबाईलची काळजी घेणेही तेवढेच आवश्यक आहे. मोबाईलमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे तो बंद पडू शकतो किंवा कधी कधी पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी जाऊन जर मोबाईल बंद पडला असेल, तर त्याची वॉरंटी किंवा गॅरंटी कुणीही देत नाही आणि तो दुरुस्त होईलच याची शाश्वतीही कुणी देऊ शकत नाही. म्हणूनच पावसाळ्यात या आपल्या महत्वपूर्ण वस्तूची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. 

मोबाईलची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स

1. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बाहेरून जरी पावसाचे पाणी आत गेले नाही, तरी आतील इलेक्ट्रॉनिक्स सर्किट मॉईश्चरायज होते. त्यामुळे मोबाईलचा एलसीडी डिस्प्ले किंवा बॅटरी खराब व्हायची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोबाईल रात्री बंद ठेवावा.

 
WD
2. पावसाळ्यात शक्यतो आपला मोबाईल प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये ठेवावा. आजकाल अनेक ट्रेंडी मोबाईल फोन कव्हर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मोबाईल प्लॅस्टिक कव्हरमध्ये ठेवल्यास पावसाच्या पाण्यापासून त्याचे संरक्षण होईल.

3. जर चुकून पावसाचे पाणी मोबाईलमध्ये गेलेच, तर त्वरित तो बंद करावा. त्यातील बॅटरी, सीम कार्ड, मेमरी कार्ड बाहेर काढावे.

4. जर चुकून जास्तीच पाणी मोबाईलमध्ये गेले असेल, तर घरातील टेबल लॅम्प किंवा ड्रायरने मोबाईलमधील पाणी पूर्णपणे सुकवावे. जोपर्यंत त्यातील पाणी सुकत नाही, तोपर्यंत फोन सुरू करू नये.

वेबदुनिया वर वाचा