शासकीय नोकरी : उत्तर प्रदेशातील विद्युत विभागात नोकरीसाठी अर्ज करा

शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:01 IST)
UPPCL Recruitment 2020 : उत्तरप्रदेशात जर आपल्याला सरकारी नोकरी करावयाची असल्यास, उत्तर प्रदेश पॉवर कार्पोरेशन लिमिटेड तरुणांना ही संधी देत आहे. यूपीपीसीएलने अकाउंट लिपिक पदासाठी अर्ज मागविले आहेत. जर आपल्याला देखील या विभागात सरकारी नोकरी मिळवायची असल्यास आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की अर्ज करण्याची प्रक्रिया 06 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांवर नोकरी संबंधित माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील, पुढे देण्यात येत आहे.
 
महत्वाच्या तारख्या -
अर्ज सादर करण्याची प्रारंभची तारीख -  06 ऑक्टोबर 2020 
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  - 27 ऑक्टोबर 2020
 
पदांचा तपशील - 
पदाचे नाव - अकाउंट लिपिक 
पदांची संख्या - एकूण 102 पदे 

वय मर्यादा -उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय वर्ष 40 निश्चित केले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता -
उमेदवारांसाठी शैक्षिणक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेणं बंधनकारक आहे. या संदर्भात पूर्ण माहितीसाठी खालील सूचनांना डाउनलोड करून वाचावं. 

अर्ज असा करावा -
उमेदवारांनी संबंधित संकेत स्थळाला भेट द्यावी आणि विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याचे प्रिंट आऊट घेऊन आगामी निवड प्रक्रियेसाठी सुरक्षित ठेवावं.
 
निवड प्रक्रिया -
या नोकरी साठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. 
 
अधिकृत संकेतस्थळासाठी इथे https://upenergy.in/uppcl क्लिक करा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती