विधानसभा सचिवालयात भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 12 जानेवारी

सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:50 IST)
यू. पी. विधानसभा भरती  : विधानसभा सचिवालय गट ख, ब आणि ग च्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवून आता 12 जानेवारी करण्यात आली आहे. पूर्वी ही तारीख 7 जानेवारी होती. प्राथमिक परीक्षेची प्रवेश पत्रे अधिकृत संकेत स्थळावरून 16 जानेवारी पर्यंत डाउनलोड करता येतील. या मध्ये परीक्षेचा संपूर्ण तपशील असेल. उमेदवार www.uplegisassemblyrecrutment.gov.in वर निश्चित शुल्कासह अर्ज करू शकतात. 
 
प्राथमिक परीक्षा 24 जानेवारी रविवारी रोजी घेण्यात येईल. विधानसभा सचिवालयात सहसचिव नरेंद्र मिश्रा ह्यांनी ही माहिती दिली. विधानसभा सचिवालयातील संपादक, रिपोर्टर, पुनरावलोकन अधिकारी, अतिरिक्त खाजगी सचिव, सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी, समवेत विविध पदांवर 87 रिक्त पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. या मध्ये 44 पदे अनारक्षित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती