सध्या कल्पकता म्हणजे क्रिएटिव्हिटीला खूप मागणी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये व्हिज्युअल आर्टस, परफॉर्मिंग आर्टस्, प्रायोगिक चित्रपट, साहित्य, ऐतिहासिक वारसा तसंच पारंपरिक हस्तकला यांच्या बाजारपेठा विस्तारत आहेत. या क्षेत्रात तज्ज्ञांची मागणी वाढते आहे. तुमच्या अंगी एखादी कला असेल तर त्या बळावर उत्तम करिअर घडवू शकता. कलात्मक करिअरचे हे काही पर्याय...
आर्ट हिस्टोरियन म्हणून तुम्ही नाव कमवू शकता. भारताचा इतिहास खूप समृद्ध आहे. आपल्या इतिहासासह यातल्या कलात्मक पैलूंची माहिती असेल तर तुम्हाला आर्ट गॅलरी, आर्ट म्युझियममध्ये चांगलं पॅकेज मिळू शकतं. अनेक ठिकाणी ऐतिहासिक कलाकृतींचा लिलाव केला जातो. इथेही तुम्ही काम करू शकता.