Refresh

This website p-marathi.webdunia.com/article/marathi-employment-news/vacancy-in-lic-118072100021_1.html is currently offline. Cloudflare's Always Online™ shows a snapshot of this web page from the Internet Archive's Wayback Machine. To check for the live version, click Refresh.

रोजगार संधी : एलआयसीत ७०० जागांची भरती

शनिवार, 21 जुलै 2018 (17:06 IST)
भारत सरकारची कंपनी असलेल्या लाइफ इंश्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये (LIC) असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर (Assistant Administrative Officer)पदासाठी भरती आहे. या पदाच्या ७०० जागा रिक्त आहेत. जागेसाठी अर्ज करायचा असेल तर किमान पदवीधर असणं गरजेचं आहे.  ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. असिस्टेंट एडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणं क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात येतंय. अधिक माहितीसाठी  एलआयसी वेबसाईटवर (www.licindia.in)जाऊन अर्ज करू शकता.
 
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे
शुल्क : जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ६०० तर  SC/ST/PWD उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल 
मुदत : २५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रीया सुरू राहणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती