शैक्षणिक पात्रता-
या भारतीय सैन्य भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित अभियांत्रिकी शाखेतील BE, B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीही या पदांसाठी अर्ज करू शकतात. या सर्व उमेदवारांना 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दाखवावे लागेल.
वेतनमान -
लेफ्टनंट पदावरील निवडलेल्या उमेदवारांना 56100 रुपये ते 177500 रुपये पगार मिळेल. यासोबतच लष्करी सेवा वेतन 15,500 रुपये असेल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान प्रति महिना 56100 रुपये मानधन दिले जाईल.