India Post Recruitment: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 29 मे पर्यंत सादर

गुरूवार, 27 मे 2021 (21:20 IST)
टपाल विभागात दहावी उत्तीर्ण युवकांच्या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी 4368 रिक्त जागांसाठी अर्ज सादर करण्याची आज शेवटची तारीख होती. परंतु आता उमेदवार 29 मेपर्यंत अर्ज सादर करू शकतात. अधिसूचनेत असे म्हटले आहे की ज्या उमेदवारांनी नोंदणीनंतर फी भरली आहे पण अंतिम अर्ज सादर करू शकलेले नाहीत अशा उमेदवारांसाठी शेवटची तारीख वाढविण्यात येत आहे.
 
या भरती भारतीय टपाल खात्याच्या बिहार आणि महाराष्ट्र मंडळात असतील. या भरतीत बिहार पोस्ट सर्कलसाठी 1940 आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलसाठी 2428 पदे आहेत. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणांवर आधारित असेल. ग्रामीण डाक सेवक या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक ही पदे भरली जातील.
 
ग्रामीण डाक सेवक यांच्या पदांवर वेतन
शाखा पोस्ट मास्टर - 12,000 ते 14,500 रुपये
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / पोस्टल सर्व्हर - 10,000 ते 12,000 रुपये
 
वय श्रेणी-
 
किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे. जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जातींना पाच वर्षांची सवलत, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे आणि अपंगांना 10 वर्षे सवलत देण्यात येईल.
 
शैक्षणिक आणि टेक्निकल पात्रता
- मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- मान्यताप्राप्त संस्थेकडून 60 दिवसांचे बेसिक कंप्यूटर ट्रेनिंग सर्टिफिकेट 
- उमेदवाराला सायकल चालवता यायला पाहिजे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती