मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ 1 वरुन 3 करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. (MD Anesthesiology) या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता 4 असणार आहे.
कोल्हापूरच्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Microbiology), (M.D. Pathology), (M.D. Pharmacology), (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 3, 4, 3 आणि 2 इतकी विद्यार्थी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Anesthesiology), (M.D. Otorhinolaryngology), (M.D. General Medicine), (M.S. General Surgery), (M.S. Obstetrics & Gynecology), (M.D. Bio Chemistry), आणि (M.S. Ophthalmology), या 7 अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4, 3, 9, 3, 3, 4 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी (M.D. Dermatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील विद्यार्थी प्रवेश क्षमता 3 असणार आहे.