DRDO च्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरीने ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेनुसार भरती मोहिमेअंतर्गत एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्जदारांची निवड पदवी/डिप्लोमा गुणांच्या आधारे केली जाईल. वॉक-इन मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rac.gov.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च आहे.
शैक्षणिक पात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थी: फूड टेक्निक/फूड प्रोसेसिंगमध्ये बी.टेक, फूड सायन्समध्ये बीएससीसाठी 4 जागा. बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स, बायो-इंजिनियरिंग किंवा बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करणाऱ्यांसाठी 2 जागा रिक्त आहेत. तर रासायनिक अभियांत्रिकी, पॉलिमर अभियांत्रिकी, प्लास्टिक अभियांत्रिकी किंवा पॉलिमर सायन्समध्ये बी.टेक किंवा बीई करणाऱ्या उमेदवारांसाठी 2 जागा रिक्त आहेत.
डिप्लोमा अप्रेंटिस: मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमासाठी 3 जागा, फूड अँड न्यूट्रिशन, हॉटेल मॅनेजमेंट किंवा केटरिंग टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा असलेल्या उमेदवारांसाठी 3 रिक्त जागा. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा असलेल्यांसाठी दोन जागा रिक्त आहेत. तसेच, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करणाऱ्यांसाठी 01 जागा रिक्त आहेत.