महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षेची तारीख आता बदलण्यात आली आहे. आता परीक्षेचं आयोजन 30 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य विभागाची गट ड परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार असल्यानं टीईटीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल वर्षा गायकवाड यांना परीक्षेच्या तारखा बदलण्याबाबब चर्चा केल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी परीक्षेचं आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या बैठकीत टीईटी परीक्षा लांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर
प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 30/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00