सरकारी नोकरीच्या शोधात FSSAI नोकरीसाठी अर्ज करा; दरमहा मिळेल तब्बल दीड ते दोन लाख रुपये पगार
सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (08:47 IST)
तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अतिशय नामी संधी चालून आली आहे. कारण, फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) मध्ये विविध पदांसाठी भरती होत आहे. FSSAI ने सल्लागार, सहसंचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपसंचालक यासह विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने भरतीशी संबंधित तपशील वाचावा आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करावी.
केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेमध्ये नियमित पदावर असलेले अधिकारी FSSAI वेबसाइटवर म्हणजेच www.fssai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची लिंक १० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध असेल.
असा करा अर्ज
सर्वप्रथम, उमेदवारांनी निर्धारित वेळेत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांनी नियोक्त्याने भरलेल्या ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी नियोक्ता/संवर्ग नियंत्रण प्राधिकरण आणि इतर सहाय्यक प्रमाणपत्रे/कागदपत्रे सोबत घेणे आवश्यक आहे. फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्या लागतील.
पत्ता:- सहायक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, तिसरा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली.