ॲमेझॉनमध्ये २० हजार नोकऱ्या; देशातील 'या' शहरांमध्ये मिळणार संधी!

सोमवार, 29 जून 2020 (08:57 IST)
ई-कॉमर्स मध्ये प्रसिध्द असणारी ॲमेझॉन कंपनी भारतात २० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. ही भरती कंपनीच्या कस्टमर सर्विस विभागामध्ये करणार आहे. हे कर्मचारी भारतातील व जगभरातील ग्राहकांना ते सेवा देणार आहेत अशी माहिती ॲमेझॉन इंडियाने रविवारी दिली. 
 
कंपनीला पुढील सहा महिन्यात ग्राहकांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यानुसार पदे भरली जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांची भरती नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगढ, इंदौर, भोपाल, लखनऊ, हैदराबाद, पुणे, कोईमतूर, मंगळुरुसाठी होणार आहेत.
 
ही भरती ॲमेझॉनच्या कस्टमर केअरसाठी असणार आहे. ज्यात वर्क फ्रॉर्म होमची सुविधा उपलब्ध असणार आहे. हे कर्मचारी ग्राहकांचा ईमेल, चॅट, सोशल मीडिया आणि फोनवरुन मदत करणार आहेत. या पदासाठी उमेदवार कमीत कमी १२ वी पास हवा. त्याचबरोबर त्याला इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नड या भाषावर चांगली पकड असावी. अशी माहिती कंपनीने दिली आहे. 
 
बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या कामगिरी आणि व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार वर्षाच्या अखेरीस कायम केल्या जातील. अ‍ॅमेझॉन इंडियाचे संचालक (ग्राहक सेवा) अक्षय प्रभू म्हणाले, "ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता आम्ही ग्राहकांना सेवा देण्याच्या आवश्यकतांचा सतत आढावा घेत आहोत. येत्या सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे. येत्या काळात भारत आणि जगात अनेक उत्सव होणार आहेत.
 
या कठीण काळात ही बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेल. नोकरीची सुरक्षा व रोजीरोटी मिळेल. त्याचवर्षी ॲमेझॉनने म्हटले होते की, २०२५ पर्यंत कंपनी भारतात १० लाख लोकांना रोजगार देण्याची योजना आखत आहे. देशात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिकमध्ये गुंतवणूक वाढवणार आहे. असेही कंपनीने सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती