बँकिंग क्षेत्रात २0 लाख रोजगार

वेबदुनिया

सोमवार, 10 फेब्रुवारी 2014 (14:54 IST)
WD
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रामध्ये पुढील ५ ते १0 वर्षांमध्ये २0 लाख नवीन नोकर्‍या उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन बँक परवाने जारी होणे तसेच रिझर्व्ह बँक आणि सरकारद्वारे ग्रामीण भागामध्ये वित्तीय सेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांमुळे बँकिंग क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील जवळपास ५0 टक्के श्रमबळ पुढील काही वर्षात सेवानवृत्त होणार आहे. अशा स्थितीत बँकांना नवीन कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. एचआर सेवा देणार्‍या 'रँडस्टँड इंडिया'च्या अंदाजानुसार बँकिंग क्षेत्रामध्ये आगामी दशकात ७ ते १0 लाख नोकर्‍या निर्माण होतील. २0१४ मध्ये बँकिंग हे क्षेत्र सर्वात जास्त नोकर्‍या देणारे क्षेत्र ठरणार आहे. मणिपाल अकॅडमी ऑफ बँकिंगच्या अंदाजानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या विस्तारामुळे रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा नवीन नोकर्‍यांची निर्मिती होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा