* बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध,
वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध,
मराठीच्या उद्धारासाठी,
कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.
* लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
* साहित्याचा वारसा चालवूया गडे,
* साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.
* माझा शब्द माझे विचार ,
माझा श्वास माझी स्फूर्ती ,
माझ्या रक्तात मराठी ,
माझी माय मराठी !!
* “वाहते रक्तातं माझ्या मराठी
गर्वांने सांगतो, आहे मी मराठी,