बाकरवडी

सारणासाठीचे साहित्य-- एक वाटी वाळवलेली कोथिंबीर, अर्धा वाटी लसूण, एक वाटी सुकं किसलेले खोबरे, दहा लवंगा, दालचिनी, चार चमचे (लहान) धने, शहाजिरे अर्धा चमचा, अर्धा चमचा मिरे, चार मोठे चमचे खसखस, दोन चमचे तीळ, तिखट, मीठ चवीप्रमाणे.

पोळीसाठी साहित्य-- अडीच वाटी डाळीचे पीठ, एक वाटी मैदा, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, मोठा चमचा तेल मोहनासाठी.

NDND
कृती-- कोथिंबीर व वाटलेला लसून वाळवावा. खोबरे खमंग भाजा. गरम मसाला, लवंगा, दालचिनी, धने, गोडजिरं, मिरी, शहाजिरे यांची पूड करावी. खसखस व तीळ खमंग भाजून त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालावं. सर्व सारण एकत्र करा. डाळीचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ व कडकडीत मोहन घालून घट्ट भिजवा. मैद्याचा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीवर वरील सारण पसरवा. त्या पोळीची घट्ट गुंडाळी करून एक इंचाचे तुकडे करा. मंद आचेवर तेल तापवून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.