संगीत म्हणजे जादू, अफलातून

सोमवार, 21 जून 2021 (08:07 IST)
संगीत म्हणजे जादू, अफलातून,
वसते ते आपल्या रोमारोमातून,
मुकं प्राणी असो, असो ही हिरवाई,
भाषा ही उमगे सऱ्यास, न बोलताही,
निसर्गातच दडलंय संगीताचं बीज,
ताकत संगीताची अशी, सर्वास करे काबीज,
तर असें हे संगीत, तालावर नाचवे आम्हास,
आम्ही ही त्याचे पाईक,सतत त्याचाच ध्यास!...
मन रमते गमते होते हलके फुलके,
वाऱ्यासवे ते ही घेऊ लागते झोके,
रागदारी असो, की लोकगीतं आपली,
तालावर त्याच्या सर्वच डोलू लागती,
कोण बरें दूर राहू शकेल या दुनिये पासून,
जन्मतो च आपण ह्या सृष्टीचे संगीत ऐकून,
श्वास, उश्वास ही एक ताल आहे न !
पापण्यांची उघडझाप ही एक नृत्यच न !
अहाहा कित्ती छान मिसळलोय आपण ह्यात,
सुटू शकत नाही न ही संगीताची साथ!
..अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती