सहल, नुसतं उच्चारलं तरी, हलके होतो,
निरुत्साह जणू कसा निसटून जातो,
चार मित्र मैत्रिणी हव्या सोबतीनं,
पंख लावून उडतो आपण उत्साहांन,
कुठं जाऊ कुठं नको असं होतं क्षणार्धात,
सगळं आयुष्य च जगून घयावस वाटत त्या क्षणात,
लहानसाना पासून सर्वास आकर्षण ह्याचे फार,
वर्षभर सुरू असतात सहली च्याच गोष्टी अपार,
येताक्षणी ती संधी, आपण झपाटतो,
लगेचच उठतो अन तयारीस लागतो,
चला तर मंडळी, चालायचं न सहली ला,