सम्रुदाखालील आगळे वेगळे लग्न!

प्रेमासाठी चाँद तारे तोडण्याचा जमाना गेला. आता काळ आहे हटके काही करण्याचा. हल्ली डेस्टिनेशन वेडिंग आणि थीम वेडिंग हे शब्द फारसे अनोळखी नाही. आता लग्नसमारंभ मोठ्या आणि काही आगळ्या वेगळ्या प्रकारे थाटाने करायचे दिवस आहे.
 
असेच एक अनोखे लग्न महाराष्ट्राच्या निखिल पवारने यांनी केले. निखिल केरळमध्यला कोवालममध्ये डायव्हर म्हणून काम करतो. आपल्या कामाच्या निमित्ताने त्याची स्लोवकियाच्या युनिका पोग्रॅमशी भेट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न 
 
करायचा निर्णय घेतला. पण या हटके कपलने आपले लग्नसुद्धा हटके करायचे ठरवले आणि सम्रुदाखाली लग्नसोहळा केला.
 
या जोडप्याच्या लग्नासाठी मग कोवालम बीचजवळच्या सम्रुदाखाली एक विशेष पोडियम तयार केले गेले. सम्रुदाखाली सात फेरे शक्य नसल्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न करायचे ठरले. निखिल-युनिकाच्या विवाहासाठी मग माहौल सज्ज झाला.
 
दोघंही स्कूबा डायव्हिंगचा पोषाख घालत सम्रुदाखाली खास तयार केलेल्या पोडियमवर एकमेकांच्या बोटात अंगठी घालत विवाहबंधनात अडकले. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचे मित्रमैत्रिणीही त्यांच्या या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याला आवर्जून हजर राहिले. 
 
आपले भारी ड्रेस मिरवण्याचा काहीच चान्स नसताना या पाहुण्यांनीही स्कूबा डायव्हिंगचा पोषाख घालत निखिल आणि युनिकाला शुभेच्छा दिल्या.

वेबदुनिया वर वाचा