ती

बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (14:01 IST)
विद्यार्थी जीवनात कधी कुठली गोष्ट घडेल सांगता येत नाही. हल्ली परीस्थिती खुप वाईट आहे. आधुनिक युगातील अन संगणक युगातील ही तरुण पीढी आज कुठल्या वळणावर उभी आहे याची काळजी नक्की करायला हवी अन वेळीच सावध होण्याची गरज आहे.
 
बारावीत होतो अन बाराविचा शेवटचा पेपर असेल अन पेपर संपला म्हणून आनंदात घरी जात होतो. तर एक मुलगा एका मुलीला छेडत होता. हे दृश्य बघून मनात संताप अनावर झालाच होता पण ? शांत डोक्याने विचार केला मित्राला कॉल केला अन तो आला बिचारीची किमान सुटका तरी झाली त्या पासून, आम्ही त्या मुलाला दम दिला तो तेथून निघून तर गेला पण आज ती मुलगी तिच्या मनाला नक्कीच वेदना झाल्या असाव्यात. किस्सा सांगायच कारण असले रोड रोमीयो बरेच कॉलेज असेल, क्लासेस असतील तिथेच फिरत असतात.
 
अर्पणा ताईंच भाषन वडील फोन वर ऐकवत होते. आम्ही सारं भाषन ऐकलं अन त्यावरील खरं वास्तव आज आपण अनुभवत आहोतच. काय नक्की परीस्थिती आहे. मुलींनी किती जागृत राहण्याची गरज आहे. पालकांनी किती मुलींवर लक्ष द्यायला हवं, शाळा कॉलेजला पाठवताना किती सतर्क असायला हवं. मुलीला घरापासून लांब पाठवत असताना किती सतर्क असावं ? बाहेरील जगाची बरोबरी नक्कीच मुलींनी करायला हवी. यात शंकाच नाही पण एका चौकटीत मुली असतील किंवा मुलं राहीलीच पाहीजेत. एक वय असत तोपर्यंतच पालक पाल्याला वळण लावू शकतात संस्कार देवू शकतात नंतर फार कठीण होऊन जात. सुसंस्कृत पीढी घडवायची असेल तर मुलामुलानी काही नियम अंगीकारलेच पाहीजेत कारण तुम्हीच उद्याचा भारत आहात. स्त्री पुरुष समानता माझ्या मते तरी होणे कठीण आहे.
 
आज बर्याच वेळेला मुलींच्या कमी कपड्यांविषयी विषय होतोच. आपली मुलींकडे बघण्याची मानसिकता कधी बदलेल. त्याही आपल्या बघीनीच असतात. प्रेम प्रकरण म्हटलं कि मुल मुली सैराट झालेली असतात तर 14 ते 25 हा वयोगट खुपच सांभाळून राहायला हवं. कारण शारिरीक किंवा क्षणीक सुखासाठी पार आयुष्य धुळीस मिळत. सध्या प्रेमप्रकरण करायचीच असतील तर धर्मातील समाजीलच मुलगा असेल किंवा मुलगी यांनी जर प्रेम लग्ना पर्यंत प्रेम प्रकरण यशस्वी करता येत असेल तर कराव अन याला आई वडीलांनीही योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यायलाही काही हरकत नाही.
 
एका नाटकाचा विषय ही असाच होता.त्या एका शाळकरी मुलाच एका मुलीवर प्रेम होत. प्रेम प्रकरणा पर्यंत ठिक होत तिच त्याच्यावर त्याच तिच्यावर जिवापाड प्रेम होत. अन ह्या प्रेमातच आकांत बुडालेली ही दोन कमी वयातील मुले अस काय पाप हातून करुन बसतात की त्याला तोंड देण कठीण होवून बसतं. कारण ह्याप्रेमाच रुपांतर संभोगात झालेलं असत अन मुलगी प्रेगनंट झालेली असते. मग काय खोट्यावर खोट बोललं जात. शेवटी मुलीचा प्रियकर ठरवतो गर्भ पात करायचा अन ते तस करतात. डॉक्टर गर्भ पात करायला नाही म्हणतात पण यांना करायचाच असतो. शेवटी त्या मुलीचे ह्या सार्या प्रकारामुळे प्राण जातात. हि गोष्ट ही कथा सांगायचा उद्देश एकच कि प्रेम प्रकरण कुठ पर्यंत योग्य आहे.
 
प्रकरण व्यवस्थित हाताळलं गेलं असं मुलांनी पालकांसमोर चुक मान्य केली असती अन पालकांनीही परीस्थितीची जाणिव ठेवून प्रकरण हाताळलं असतं तर मुलीचे प्राण गेले नसते. आज असल्या क्षणीक शारिरीक सुखामुळे बरीच मुलमुली फसतात. लहान वयातील बुद्धीती तेवढाच विचार करणार त्यात ईश्वरी देणगी. प्रौडावस्थेत झालेले बदल अन त्यावर नसलेला कंट्रोल ह्या मुळेही बर्याच वाईट अन संस्कारहीन कृत्य घडली जातात. त्या खर तर कुणाचा दोष असणार.
 
संस्कृती बदलतेय तेवढे तिचे परीणाम ही घातक होत जात आहेत. त्या तरुण पिढी मोबाईल नेट अजून सोशल मिडीया मुळे परीणाम अजून घातक होत आहेत. वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहेच.हो पण कधी होणार आहात सावध?
 
Virendra Sonawane

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती