लावली चटक गोऱ्यानी चहाची,
काळा माणूस करू लागला चाकरी त्याची,
हळूहळू करता झाला सवयी चा गुलाम,
चहा विना आता त्याच्या जीवनात न उरला राम,
सकाळ असो की संध्याकाळ, लागतोच चहा,
उरलेले नाही चहा विन त्याच्या आयुष्यात पहा,
सर्वच क्षणी त्याची उपस्थिती असतेच बरं,
सण असो की समारंभ, पेय हेच खरं!
काळा असला तरी चालेल बाबा!असें म्हणणारे,
इतका मिसळून गेलाय तो, भाग्य आपुले,
असो पण अर्ध्या कपात ही जीं कता येतं माणसाला,