एकदा स्वामी विवेकानन्द यांच्या आश्रमात एक व्यक्ती आली जी फार दु:खी जाणवत होती. ती व्यक्ती आल्याक्षणी स्वामींच्या पायात पडून म्हणे मी जीवनामुळे खूप दु:खी आहे आणि आपल्या दैनिक जीवनात खूप मेहनत करतो, मन लावून काम करतो तरी यश हाती लागत नाहीये. देवाने मला असे नशीब का बरं दिले. मी शिक्षित आणि मेहनती असूनही यशस्वी आणि धनवान होऊ शकत नाहीये.
माणूस म्हणाला, “मी तर आपल्या रस्त्यावर सरळ चालत होतो परंतू हा कुत्रा गल्लीतल्या सर्व कुत्र्यांमागे पळत होता आणि भांडून पुन्हा माझ्याकडे येत होता. आम्ही दोघांनी सारखाच रस्ता धरला होता परंतू कुत्र्याने अधिक धावपळ केल्यामुळे तो थकून गेला.”