Sant Damajipant Information : महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत ज्यांनी भक्तिमार्गाचा मळा फुलवला. समाजाला भक्तिमार्गाचा संदेश दिला. या सर्व संतांपैकी एक संत दामाजीपंत देखील होते. संत दामाजीपंत हे मंगळवेढा येथील महान संत होते. संत दामाजीपंत यांचा कार्यकाळ १३०० ते १३८२ एवढा आहे. ते बिदर येथील मुहम्मद शाहच्या दरबारात सेनापती होते. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्यांची मंगळवेढ्याचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तसेच संत दामाजी पंत यांच्या जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. संत दामाजी पंत हे कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे खूप प्रसिद्ध होते.
शके १३७६ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा त्यांनी अन्नाचे कोठारे बनवले होते. त्यांनी आपले सर्व धान्याचे कोठारे लोकांसाठी खुले करून दिले होते. तसेच सम्राटाने त्यांना अटक करण्यासाठी एक सेना पाठवली होती. व त्यांना बिदर येथे येण्याचा आदेश दिला होता. तसेच संत दामाजी पंतांबद्दल अशी दंतकथा प्रचलित आहे की, प्रवास करीत असतांना साक्षात विठ्ठलाने विठू महाराचे रूप घेतले आणि सम्राटाला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि पावती घेऊन ती दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. नंतर दामाजीपंतांची सुटका झाली. याकरिता सम्राट ने दामाजीपंत यांना बीदर दरबार बोलावून, त्यांना बंधनमुक्त करून सन्मानित केले, व त्यांना सांगितले की,तुमच्या विठु महार धन पोहचवले. आता मात्र संत दामाजी पंत आश्चर्यचकित होऊन विचारू लागले की, विठु महार कोण जे मला वाचवायला आले होते. आता मात्र त्यांना आश्चर्य वाटले जसे त्यांना समजले विठूमाऊली आली होती तसा त्यांचा पांडुरंगावरचा विश्वास अजून वाढला, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे आपले उर्वरित जीवन पांडुरंगाची सेवा करण्यात सोपवले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दुष्काळग्रस्त लोकांची सेवा केली यामुळे त्यांचे नाव अमर झाले.