राष्ट्रीय डॉक्टर दिवस

सोमवार, 1 जुलै 2024 (11:46 IST)
प्रत्येक वर्षी1 जुलैला National Doctors Day म्हणजे राष्ट्रीय चिकित्सक दिवस साजरा करण्यात येतो.  हा दिवस साजरा करण्याची सुरवात एक महान डॉक्टर यांच्या आठवणींमध्ये झाली आहे. ज्यांचे नाव आहे, डॉ. बिधान चंद्र राॅय. जे बंगालचे पूर्व मुख्यमंत्री देखील होते. जगामध्ये वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पण भारतात 1 जुलैला साजरा करण्यात येतो.
 
आरोग्यदायी जीवन प्रत्येकाची प्रियोरिटी लिस्टमध्ये टॉप वर आहे. सांगितले देखील आहे की, 'आरोग्य सर्वात मोठी पूंजी आहे' आरोग्यदायी व्यक्ती जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तसेच यामध्ये  डॉक्टरांची भूमिका महत्वाची असते. छोट्या-मोठ्या अनेक आजारांना डॉक्टर्स बरे करतात. कदाचित या करिताच डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय चिकित्सक दिवस प्रसिद्ध डॉक्टर आणि  बंगालचे दूसरे मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र राय यांच्या सम्मान मध्ये साजरा करण्यात येतो.
 
भारतामध्ये 1 जुलैला हा दिवस साजरा केला जातो. कारण 1 जुलै 1882 मध्ये इंडियाचे प्रसिद्ध फिजीशियन डॉ. बिधान चंद्र राय यांचा जन्म झाला होता तसेच तसेच त्यांचे निधन देखील १ जुलै  1962 मध्ये झाले होते. चिकित्सा क्षेत्रामध्ये त्याच्या योगदानाला सन्मान देण्याच्या उद्देशाने 1 जुलैला डॉक्टर्स दिवस साजरा करण्यात येतो.
 
डॉक्टर्स डे साजरा करण्याचा उद्देश्य-
हा दिवस साजरा करण्याचा उद्देश डॉक्टर्सचे योगदान, त्यांचा कार्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे. जे आपले सुख-दुःख बाजूला ठेऊन रुग्णांची सेवा करतात. तसेच समाजाला रोगमुक्त ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बाजवतात.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती