निसर्गाकडून काय घ्यावे

मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (16:54 IST)
माणसाने आपल्या जीवनात फुलांकडून स्वच्छंदपणे जीवन जगण्याचे मंत्र घ्यावे.
हिरव्या हिरव्या पानांकडून जीवनात समृद्धी घ्यावी.
खळखळणा-या पाण्याकडून जीवनात हास्य घ्यावे.
आकाशाकडून जीवन जगताना मनात शंका-कुशंका न बाळगता दुस-यांकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर सदैव घ्यावा.
कितीजरी जीवनात संकटे आली तरी डोंगरासारखी सहन करण्याची क्षमता घ्यावी.
सूर्य जसा सा-या चराचर सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाश किरणाने जगण्यासाठी प्रेरणा देतो, त्याप्रमाणे आपणही या जीवनात काहीतरी दातृत्वाची प्रेरणा घ्यावी. 
 
असे जर कुणा कुणाला काही ना काही करण्यासाठी निसर्ग प्रेरीत करतो आणि सा-यांचेच जीवन सुखासमाधानत ठेवतो. त्याच्याजवळ कसल्याही प्रकारचा भेद नाही. अशीच भूमिका आपण जर आपल्या जीवनात अंगीकारली, तर आपले जीवनही नक्कीच कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना 'शिकावे ते निसर्गाकडून आणि घ्यावे तेही निसर्गाकडूनच'.

- सोशल  मीडिया 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती