तर काय भारत 'लिंचिस्तान' बनत आहे ...?

संदीपसिंह सिसोदिया

गुरूवार, 26 जुलै 2018 (11:27 IST)
गर्दी... खरंतर माणसाचा कळप किंवा गट. या गटापासून संघटन बनते. हे संघटन कधी चांगल्या गोष्टी घडवतात तर कधी विध्वंस करतात. जनसमूहांमुळे अनेक गोष्टी घडतात. जगातील मोठ्या मोठ्या घडामोडी जनसमुदायामुळेच घडतात. प्रत्येक गटाचा नेतृत्व करणारा कधी महात्मा तर कधी तानाशाह असू शकतो. त्यांचा विचाराचा प्रभाव गटातील सदस्यांवर पडतो. त्यावर जगात शांतता असावी की युद्ध ? याचा निर्णय घेण्यास समाज अपयशी ठरतो. 
 
मॉब लीचिंग हे आजच्या काळाचे नसून शेकडो वर्षांपासूनचे आहे. जगातील अनेक देशात विद्रोहाची उत्पत्ती जमावापासूनच झाली आहे. मग ते 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती असो वा 1917 ची रशियन बंडखोरी. 19 ऑगस्ट 1901 रोजी तीन आफ्रिकी अमेरिकन माणसांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. त्यावर मार्क ट्वेन यांनी अमेरिकेतील रहिवाश्यांवर लिंचिंगचे आरोप सिद्ध करून एक लेख "युनाइटेड स्टेट्स ऑफ लिंचरडम" प्रकाशित केले होते. 
 
सध्याच्या काळात मॉब लिंचिंगचे काळे वादळ 
आपल्या भारतात देखील झपाट्याने पसरत आहे. मॉब लीचिंग म्हणजे एका जमावाने एखाद्यावर हल्ला करणे. सध्याच्या काळात मॉब लीचिंग जास्त प्रमाणात वाढल्याने असे वाटू लागले की भारतात आततायीपणा सुरू आहे. ? अराजकपणा दिवसें दिवस पसरतच चालला आहे.
 
कधी गायीच्या नावाखाली पेहराम खान आणि अकबर खान (पोलिसाच्या कोठडीत मरण पावलेले) मारले जातात. तर कधी मोहम्मद अखलाकला गोमांसाच्या गुन्हेगारीत नोएडा येथे ठार मारले जाते. तर कधी लव्ह जिहादाच्या नावाखाली कोणाची तरी बळी घेतात. तर कधी सोशल मीडिया कडून किड्स चोर अशी अफवा पसरविल्यामुळे गर्दीत जमलेले सुजाण नागरिक स्वतःच्या हाती कायदा घेण्यात तत्पर होतात. 
 
पण जरा विचार करा की जर का न्याय करण्याची ही पद्धत देशाच्या काही भागात किंवा विशिष्ट क्षेत्रात तर असेल तर या घटनाक्रमावर एकदा नजर टाका... 
 
मॉब लिंचिंगची सर्वात मोठी घटना 1 जुलै 2018 रोजी घडली. महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या रानपाडा गावात लोकांनी 5 जणांना ठार मारून कायदा आपल्या हाती घेऊन न्याय केले. या 5 जणांवर 'मुलं चोर' असण्याचा आरोप होता.
 
आसामच्या कर्बी अगलांग जिल्हाच्या दुर्गम ठिकाणी 9 जून 2018 रोजी सोशल मीडियाने पसरविल्या 'मुलं चोर टोळी' च्या बातमीने 2 संशयितांना गावकऱ्याने ठार मारले.  
 
वेल्लोर जिल्ह्यात 28 एप्रिल 2018 रोजी एका हिंदी भाषी मजुरास 'मुलं चोर' असण्याच्या संशयावरून ठार मारले. तसेच जूनमध्येच चेन्नईच्या तेनमपेट भागात स्थानिकांनी 2 प्रवासी मजुरांना 'मुलं चोर' असल्याच्या संशयावरून मार-हाण केली.
 
15 जून 2018 रोजी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात मुरकी गावात एका सॉफ्टवेअर इंजिनियरांची निव्वळ व्हाट्सअॅप वर 'मुलं चोर' असल्याच्या पसरलेल्या अफवांमुळे संशयावरून हत्या केली. ह्यात 3 जण गांर्भीयरित्या जखमी झाले.
 
21 जुलै रोजी पाकिस्तानच्या सीमे जवळच्या राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील खेताराम भिल्ल याची एका मुस्लिम महिलेशी 'अनैतिक संबंधाच्या' आरोपांवरून 12 जणांनी ठार मारल्याची बातमी आहे. 
 
16 जून 2017 रोजी राजस्थानच्या प्रतापगडामध्ये मुस्लिम नगरसेवक जफर हुसेन याला सरकारी नगर परिषद कर्मचार्‍यांनी मारहाण करत ठार केले. जफरने आपल्या अधिकाऱ्यांना उघड्यावर शौच करीत असलेल्या महिलांची छायाचित्रे घेण्यास रोखले होते.
 
22 जून 2017 रोजी काश्मीर येथे सुरक्षा अधिकारी मोहम्मद अयुब पंडित याला गावकऱ्यांनी निर्वस्त्र करून ठार मारले. कारण ते मशिदी बाहेर उभारून लोकांचे फोटो घेत होते.
 
24 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात संतप्त जमावाने 4 बायकांशी गैरवर्तन करून(निर्वस्त्र करून) त्यांना मार-हाण केली आणि त्यांच्यावर 'मुलं चोर' असल्याचा आरोप होता. त्याच महिन्यात अश्या 2 अजून घटना झाल्या आहे.
 
2017 जुलै मध्ये हरियाणाच्या बल्लभगढ येथे वयोगट 16 वर्षाच्या जुनेदला निव्वळ ट्रेन मधील सीटवर बसण्याच्या वादातून ठार मारले. 
 
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासूनच संपूर्ण भारतात अश्या बऱ्याच घटना घडल्या आहे. ज्यात सोशल मीडिया आणि त्यावर पसरविलेल्या अफवांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या शासनास सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकार लावली आहे. आणि त्याला "भीडतंत्राचा अराजकपणा" असे म्हटले आहे. 
 
पण एक प्रश्न उद्भवतो की या संतप्त जमावाचा मूळ खलनायक आहे तरी कोण ? 
यंदाचा काळ हा डिजीटल युगाचा आहे. इथे कुठलीपण माहिती विजेच्या वेगाने प्रसरण पावते. शहर असो किंवा गाव असो आधीच्या काळी गावा गावात एकत्र होऊन होणारी चर्चा आता सर्वत्र पसरत आहे. आता ह्याचे दुरुपयोग होऊ लागले आहे. लोकं  अनिष्ट माहिती बघण्या आणि वाचण्यासाठी याचा गैर वापर करत आहे. समाजात प्रेमाचे स्वरूप आता पॉर्न मध्ये बदलत आहे. अधीरपणा, थेट संवाद न होणे त्यामुळे सामाजिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. अविचारी संदेश सर्रास पुढे पाठवले जातात. मुलांची चोरी, धार्मिक, राजकीय किंवा सुनियोजित अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे जमावा कडून संतप्त प्रतिक्रिया येते आणि वैचारिक मतभेद होतात आणि तशी प्रतिक्रिया दिली जाते.  
 
या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाच्या हाती असणारा स्मार्टफोन. त्यावरून सोशल मिडिया वर पसरणारे असंतोषजनक कथन. मुलांची चोरी सारख्या बऱ्याच अफवा व्हाट्सअॅपवर पसरवल्या जातात. ताण तणाव निर्माण होऊन काही गोंधळ होऊ नये त्यासाठी प्रशासन सर्वात आधी इंटरनेट वर बंदी घालण्याचे हे मुख्य कारण आहे. असे बघण्यात आले आहे की व्हाट्सअॅप वरून अश्या अराजकता पसरविणाऱ्या संदेशामुळेच जमाव संतप्त होतो आणि गैर वर्तन करतो. सोशल मेसेजिंग अॅप्स व्हॅट्सअॅपवरून सर्रास या संदेशांची सत्यता प्रमाणित न करता पुढे पाठवतात. काही वेळा पूर्वी वैमनस्यावरून पण जमाव उग्र रूप घेतो. आणि गर्दीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी घेत असे. 
 
कधीतरी कुठे तरी एक शब्द वाचला होता 'लिंचिस्तान'. ते आजच्या वातावरणास साजेशीर आहे असे वाटते. काही वेळा या घटनेची दुःखदायक बाब म्हणजे काही राजकीय आणि सामाजिक संस्था आपापल्या सुविधेनुसार घटनेला अधिक वळण देतात. अश्या स्थितीत त्यांचा विरोध करण्याचे घटनाक्रम राजकीय वाटू लागते. त्यामुळे ते निवळते. 
 
संपूर्ण जगाला शांती देणाऱ्या या देशात आजचा काळी एक भयावह मॉब संस्कृतीने तोंड वर केले आहे. त्यामुळे शांती आणि अमनची वाट दाखवणारा हिंदुस्तान आता लिंचिस्तान बनत चालला आहे की काय असा मोठा यक्ष प्रश्न पुढे आला आहे?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती