जादूगार पी.सी. सोरकार (ज्यु) घेऊन येतायेत "द अमेझिंग मॅजिक फेस्टिवल"

शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (13:22 IST)
१४ ऑक्टोबर २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान १०० लाईव्ह शोज 
 
डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच समोरची गोष्ट गायब करणारे जादूगार नेमकं काय करतात हा फंडा शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतोच. पण शेवटी ते जादूगारच.  त्यांच्या क्लुप्त्यांचा थांगपत्ता लागणं कठीण, पण त्यातच खरी मजा आहे. खरंतर ही कला आयुष्य म्हणून जगणाऱ्या एका व्यक्तीने जगावर आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. बंगालच्या गोड मिठाईचा गोडवा असलेले पी.सी.सोरकार यांनी जादुई दुनियेत ध्रुवासारखं अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा पद्मश्री पी.सी.सोरकार यांची नात मनेका सोरकार पुढे चालविण्यासाठी सज्ज झाली आहे, पी.सी.सोरकार (ज्यु) यांच्या तीन कन्यांपैकी मनेकाने हा वारसा पुढे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. द ग्रेट मॅजिशीयन म्हणून ओळखले जाणारे सोरकार यांनी लंडन पॅरिस, रोम, मॉसको, टोकियो अशी जगभर भ्रमंती करत त्यांनी भारताचं नाव रोशन केलं आहे. ४० टन जादूचे साहित्य, ३५ सहाय्यक, भन्नाट संगीत, क्षणार्धात घडणारी जादू या सगळ्याचं उत्तम मिश्रण पाहण्यासाठी पी.सी. सोरकार (ज्यु) यांच्या कार्यक्रमांना प्रेक्षक आवर्जून उपस्थित राहतात. सोरकार घराण्याची नववी पिढी या सादरीकरणात उतरत असल्याने या शोचं औत्सुक्य वाढलं आहे. निर्मिती ग्रुप ऑफ कंपनीज, रामानंद को ऑप क्रेडिट सोसायटी लि., दिग्विजय व्हेंचर्स आणि शुअरवीन यांच्या वतीने होणार आहे. "द अमेझिंग मॅजिक फेस्टिवल" चे १०० लाईव्ह शोजला १४ ऑक्टोबर २०१७ रोजी इमॅजिका येथे सुरुवात होणार असून  गोव्यात २८ फेब्रुवारी २०१८ रोजी या फेस्टिवलची सांगता होईल. हे १०० शोज मुंबईत बांद्रा, नरिमन पॉईंट, प्रभादेवी, अंधेरी, चेंबूर, बोरिवली, ठाणे, पनवेल, वाशी मुलुंड, माटुंगा, विलेपार्ले आणि पुण्यात स्वारगेट, कोथरूड, शिवाजी नगर, बिबवेवाडी तर नाशिक,  औरंगाबाद , नागपूरमध्ये एमएलए हॉस्टेल सिव्हिल लाईन त्याचबरोबर गुजरातमध्ये सुरत तसेच गोव्यात मडगांव, पोंडा, पणजी, सांकळी या निवडक ठिकाणी होणार आहे. हा ग्रेट मॅजिक शो 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या धोरणाचा अवलंब करत पी.सी.सोरकार (ज्यु) आणि मनेका सोरकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. काही निवडक शाळांमध्ये या मॅजिक शोची टीम खास भेट देणार आहेत. मोबाईल, व्हिडियो गेम्स किंवा इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी या बेस्ट मॅजिक शोच्या माध्यमातून उत्तम खतपाणी मिळेल. शालेय मुलांना या कार्यक्रमासाठी असणाऱ्या तिकिटात विशेष सवलत आहेच पण त्यासोबत प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी निघणाऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची 'पी.सी.सोरकार स्कॉलरशीप' पी.सी. सोरकार (ज्यु) यांच्या हस्ते मिळणार आहे. या वर्षीपासून सुरु करण्यात येत असलेल्या 'पी.सी.सोरकार स्कॉलरशीप' चा यापुढेही प्रत्येकवर्षी होणाऱ्या प्रत्येक शोमध्ये एका विद्यार्थ्याला लाभ घेता येईल. हा मॅजिक शो सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी  मनोरंजनाची उत्तम सुवर्णसंधी आहे. पी.सी.सोरकार (ज्यु) यांची थक्क करणारी जादूगरी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणारी आहे. त्यामुळे आता त्यांच्या मुलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. डोळ्यासमोर असणारा जगातील सर्वात सुंदर ताजमहाल क्षणार्धात गायब करणे आणि माणसांनी भरलेली ट्रेन पाहता पाहता अदृश्य करण्याची कला याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली आहे. त्याचबरोबर कुतुबमिनार वाकवण्याचा जादुई पराक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सोरकार घराण्याच्या परंपरागत चालत आलेल्या कलेचा वारसा पुढे चालविण्याबाबत मनेका खूपच आनंदी असल्याचं सांगते. या मॅजिक शोची सांगता करताना, पी.सी.सोरकार (ज्यु) यांच्या पत्नी जोयश्री सोरकार यांचा आवाक करणारा परफॉर्मन्सला पाहून प्रेक्षक नक्कीच थक्क होतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती