Jyotiba Phule Jayanti 2020: मुलींसाठी पहिली शाळा उघडणारे महान व्यक्तिमत्त्व

शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (12:16 IST)
स्त्री शिक्षेसाठी ज्योतिबा फुले यांनी खूप प्रयत्न केले. 1848 मध्ये त्यांनी देशातील प्रथम बालिका शाळेची स्थापना केली होती. जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक तयार नसायचे अशात त्यांनी आपल्या पत्नीला यासाठी तयार केले. या प्रकारेच त्यांची पत्नी सावित्री बाई फुले देशातील प्रथम महिला शिक्षिका झाल्या.
 
नंतर दोघांच्या अथक प्रयत्नाने मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी तीन आणखी शाळा उघडल्या. 1873 मध्ये त्यांनी दलित वर्गाच्या प्रगतीसाठी आणि त्यांना न्याय मिळावे यासाठी सत्य शोधक समाजाची स्थापना केली. त्यांची समाजसेवा आणि वंचितांसाठी केलेल्या कार्यांनी प्रभावित होऊन त्यांना 1888 साली मुंबईत एक विशाल सभा आयोजित करून त्यांना महात्मा अशी उपाधी देण्यात आली.
 
ते बाल विवाह विरोधी आणि विधवा विवाहाचे कट्टर समर्थक होते. 1854 साली त्यांनी उच्च वर्गाच्या विधवांसाठी एक विधवाघर देखील निर्मित केले. त्यांनी जनविरोधी शासकीय कायद्यांविरोधात देखील संघर्ष केला. ज्यामुळे सरकारने एग्रीकल्चर अॅक्ट पास केला.
 
त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन देखील केले त्यात गुलामगिरी, तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी, राज भोसला का पखड़ा आणि किसान का कोड़ा मुख्य आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती