International Tiger Day 2023 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
शनिवार, 29 जुलै 2023 (12:01 IST)
International Tiger Day 2023
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिद्यते वनम्।
तस्माद्व्याघ्रो वनं रक्षेद्वयं व्याघ्रं च पालयेत् ॥
- महाभारत – उद्योग पर्व : 5.29.57
अर्थात जंगल नसेल तर वाघ मारले जाणार, वाघ नसतील तर जंगल नष्ट होऊन जाणार, म्हणून वाघ जंगलाचे रक्षण करतात आणि वन वाघाचे रक्षण करतात !
आंतरराष्ट्रीय वाघ दिवस दर वर्षी 29 जुलैला साजर करण्यात येतो. ह्याची सुरुवात 2010 मध्ये रशियाचे सेंट पीटर्सबर्गमध्ये झालेल्या टायगर समिटमध्ये झाली होती. 20 व्या शतकाच्या सुरूवातीपासून जंगली वाघांची संख्या 95% पेक्षा जास्त कमी झाली होती त्यामुळे वाघांची काळजी घ्यायला आणि त्यांना लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली गेली. ह्याचा मुख्य उद्देश्य वाघांचे संरक्षण हे आहे.
भारतात वाघांची स्तिथी :-
जगात असलेल्या वाघांमधून 70 % वाघ भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आकड्यांप्रमाणे भारतात वाघांची संख्या 2018 मध्ये 2,967 वरून 2022 मध्ये 3,167 पर्यंत वाढली आहे.
भारतने वाघ आणि इतर वन्यजीवांचे संरक्षणासाठी अनेकदा पाऊल घेतले आहे. 1972 मध्ये वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं. 1973 मध्ये भारत सरकारने "प्रोजेक्ट टायगर" ह्याची स्थापना केली होती. मुख्यत: ह्याचा उद्देश्य बंगाल टागरर्सचे मूळ वातावरणात संरक्षण करायचं होतं त्याचबरोबर देशात असलेले इतर वाघांची प्रजातींना लुप्त होण्यापासून वाचवण्याचे कार्य देखील होते. 80 च्या दशकात जिथे 9 वाघ आरक्षण केंद्र होते तिथे 2022 मध्ये उत्तर प्रदेशचे राणीपुर वन्यजीव अभयारण्य येथे देशाचा 54 व्या वाघ राखीव केंद्राची स्थापना झाली.
वर्ष 2022 मध्ये टायगर प्रोजेक्टची 50 वी वर्षंगाठ साजरी करताना आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) ह्याची स्थापना केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात मोठ्या मांजरींच्या प्रजाती वाघ, सिंह, लेपर्ड, स्नो लेपर्ड, चित्ता, जग्वार आणि प्यूमा ह्यांना संरक्षित ठेवायला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) सुरू केले. ह्याचे उद्देश्य 97 देशात असलेले नैसर्गिक अधिवासापर्यंत पोहोचण्याचे आहे.
वाघांचे लुप्त होण्यामध्ये सगळ्यात मोठे कारण म्हणजे शिकार, वन्यजीवांचा अवैध व्यापार, वनस्पती नुकसान, हवामानमधील बदलाव हे आहेत. वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आणले कारण ह्यांचे आपले इकोसिस्टममध्ये मह्त्वाचे योगदान आहे. न केवळ ह्यांचे योगदान पण सगळे जीव-जंतूंनाही जिवंत राहायचं अधिकार आहे.
ह्यांच्या संरक्षणासाठी आदिवासी जनजातींचं मोठा योगदान मानलं गेलं आहे. ते न केवळ जनावर आणि वनस्पतींच्या संरक्षणासाठी निस्वार्थ कार्य करतात पण विकसित शहरांप्रमाणे प्रागतीच्या नावावर वन्यजीव आणि नैसर्गिक स्थानानं कष्ट देखील पोहोचवत नाहीत.