नरेंद्र मोदी यांच्या बद्दल महत्वाच्या गोष्टी

गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (14:29 IST)
नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान, ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भारताला शक्तिशाली आणि महत्त्वपूर्ण देशांच्या यादी मध्ये समाविष्ट केले. हे सर्व त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे परिणाम आहेत. चला मग जाणून घेऊया नरेंद्र मोदींबद्दल काही महत्वाची माहिती.
 
१) नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी वडणगर, गुजरात येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
२) त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर दास मुलचंद होते आणि आईचे नाव हिराबेन आहे. नरेंद्र मोदी यांच्या आई वडीलांचे एकूण सहा मुले होती.
३) मोदींनी वडनगरच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना राजकारणात रस होता नंतर त्यांनी गुजरात विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली.
४) मोदीची तरुणपणी आपल्या भावाबरोबर चहाचे दुकान चालवायचे. भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान त्यांनी रेल्वेस्थानकावर सैनिक म्हणून कार्य सुध्दा केले आहे.
५) नरेंद्र मोदी शाकाहारी आहेत आणि उत्तम वक्ता आहेत. ते एक अंतर्मुखी आणि नियमित काम करत राहणारी व्यक्ती आहेत.
६) शाळेच्या काळापासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते, नंतर त्यांना भारतीय जनता पार्टी साठी नामांकन मिळाले.
७) भारतीय जनता पक्षात मोदींनी मेहनतीने काम केले आणि म्हणूनच त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवून दिल्लीला पाठवले गेले. नंतर त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून निवडण्यात आले.
८) २००१ मधे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. केशुभाई पटेल यांचे स्थान मोदींनी घेतले.
९) २००२ मधे राजकीय दबावामुळे त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पण त्याच वर्षी बहुसंख्य मतांनी जिंकल्यानंतर ते पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
१०) त्यानंतर ते परत २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत जिंकून गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी २०६३ दिवसांसाठी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम नोंदविला आहे.
११) सोशल नेटवर्किंग साइटवर मोदी बरेच प्रसिद्ध आहेत. ऑगस्ट ३१, २०१२ रोजी गुगल प्लस च्या नेटिझन्स बरोबर चर्चा करणारे ते पहिले भारतीय राजकारणी आहेत.
१२) संपूर्ण भारताच्या इतिहासात काँग्रेसनंतर केवळ भाजपच पक्ष असा आहे की ज्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षावर पूर्ण बहुमत प्राप्त केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभेत आपला संपूर्ण इतिहास सार्थ केला आहे.
१३) आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तासांपेक्षा कमी झोपतात. ते रात्री कितीही उशिरा झोपले असतील तरीही ते दररोज सकाळी पाच वाजताच ऊठतात.
१४) नरेंद्र मोदी कुठलेही मोठे कार्य करण्याअगोदर आणि आपल्या वाढदिवसाला आपल्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद नेहमीच घेतात.
१५) १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात लढाई केली होती. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक जयप्रकाश नारायण होते.

- रोहित म्हात्रे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती