शहीद दिन विशेष : शिवराम राजगुरू

हुतात्मा राजगुरू यांचा आज बलिदान दिवस, राजगुरुंचा जन्म पुण्याजळव खेड येथे 24 ऑगस्ट 1908 रोजी एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना रघुनाथ या नावानेही ओळखले जात असे. लहानपणी 14व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्ष केली. हा अपमान राजगुरुंना सहना झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय जाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. ध्येयासाठी व होतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. 23 मार्च 1939च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. भारतात 23 मार्च हा दिवस  शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. 

वेबदुनिया वर वाचा