धूम्रपानात भारतीय महिला जगात तिसर्‍या

जगभरात झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धूम्रपान होतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण जास्त असणार्‍या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
 
एका अभ्यासानुसार 2015 साली झालेल्या 64 लाख मृत्यूंपैकी 11 टक्के लोकांचे मृत्यू हे धूम्रपानाने झाले होते. कारण धूम्रपानच्या सवयीमुळे शरीर कमकुवत होऊन व्यक्तीची रोग‍प्रतिकारक शक्ती कमी होते. धूम्रपान करणार्‍या पुरूषांचं प्रमाण जास्त असलेल्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे तर महिलांचं प्रमाण जास्त असणार्‍या यादीत भारत देश तिसर्‍या क्रमांकावर आहे.
 
तसंच धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात 5 टक्कयांची वाढ झालीय आणि ही वाढ चिंताजनक असल्याचंही जीबीडीच्या अहवालात म्हटलंय. जवळपास 195 देशांच्या धूम्रपान करणार्‍या लोकांच्या सवयींना अभ्यास करून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा