प्रार्थनेचे सार....

शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:05 IST)
एक मुलगी वडिलांकडे गेली आणि म्हणाली, "मी आता मंदिरात जाणार नाही."
वडिलांनी विचारले : "का ?
"ती म्हणाली : "जेव्हा मी तिथे जाते तेव्हा मला जे सर्व दिसतात ते लोक सेवा आणि भजनाच्या वेळी त्यांच्या मोबाइल फोनवर असतात, काही जण गप्पा मारत असतात तर काहीजण फक्त इकडे तिकडे भटकत असतात." 
वडील गप्प बसले आणि मग म्हणाले : "ठिक आहे, तू तुझा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माझ्यासाठी एक गोष्ट करशील ?" 
ती म्हणाली : "हो , नक्कीच, सांगा काय आहे ?"
वडिल म्हणाले : "एक ग्लास भरून पाणी घे आणि मंदिराची २ वेळा प्रदक्षिणा कर; परंतु लक्षात ठेव ग्लासमधून पाणी सांडू देऊ नको."
ती म्हणाली : "हो , मी ते नक्कीच करू शकते."
प्रदक्षिणा करून ती परत आली आणि म्हणाली, "हे झाले आणि ग्लासमधले पाणी पण सांडले नाही."
 
वडीलांनी तिला तीन प्रश्न विचारले -
1. तू कोणाला फोनवर बोलताना पाहिले का ?
2. तुला कुणी गप्पा मारताना दिसले का ?
3. तुला कोणी इकडे तिकडे भटकताना दिसले का ?
                                                                                                                                                        ती म्हणाली : "मी कसं कोणाला पाहू शकले असते ? मला काहीही दिसले नाही, मी फक्त लक्ष केंद्रित केले होते त्या ग्लासवर आणि त्यातील पाण्यावर, जेणेकरून पाणी खाली पडणार नाही."
मग वडील तीला म्हणाले , "तुम्ही मंदिरात जाताना असेच केले पाहिजे. आपण लक्ष एकाग्र केले पाहिजे आणि विचारानी फक्त देवाशी एकरूप झाले पाहिजे ! बाकी काही नाही."
मुलीला तिची चूक समजली आणि तिने "प्रार्थनेचे सार" समजून घेण्यात मदत केल्याबद्दल तिच्या वडिलांचे आभार मानले.
 
 
-सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती