या लोकांसाठी पासपोर्ट काढणे झाले सोपे, कसे जाणून घ्या

केंद्र सरकारने पासपोर्ट तयार करण्यासाठी नियम सोपे केले आहेत. यामुळे आता अनेक लोकांना पासपोर्टसाठी आवेदन करणे सोपे जाईल आणि काही दिवसातच त्यांना पासपोर्ट हातात मिळेल. असे नऊ नियम आहे, तर आपण ही जाणून घ्या नियम:
 
बर्थ डेट प्रूफ 
पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी जन्म तारखेचा पुरावा म्हणून केवळ बर्थ सर्टिफिकेट मागितले जात होते. परंतू आता बर्थ सर्टिफिकेट व्यतिरिक्त स्कूल ट्रांसफर सर्टिफिकेट, दहावीची मार्कशीट, पॅन कार्ड, आधार कार्ड, सरकारी आयडी कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, मतदाता ओळख पत्र आणि विमा पॉलिसी देखील देऊ शकता. अर्थातच यावर जन्म तिथीचा उल्लेख असणे अनिवार्य आहे.
 
सिंगल पॅरेंट किंवा गार्जियनचे नाव
पूर्वी आवेदकाला आई-वडील दोघांचे नाव आवेदन पत्रात द्यावे लागत होते. परंतू आता आवेदक केवळ आई किंवा केवळ पिता किंवा लीगल गार्जियनचे नाव देऊ शकतात. आवेदकाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्यास एकाचे नाव देता येईल. यासाठी कुठल्याही पुराव्याची गरज नाही.
 
संलग्नकांच्या संख्येत कमी
पासपोर्ट ऍक्ट 1980 प्रमाणे पूर्वी आवेदनासोबत 15 एनेक्सचर्स संलग्न करावे लागत होते ज्यातून काहीसाठी नोटरी किंवा प्रथम श्रेणी मजिस्ट्रेटकडून हस्ताक्षर घेणे आवश्यक होते. आता यांची संख्या नऊ केली गेली आहे. आता  एनेक्सचर्स 'ए, 'सी', 'डी', 'ई', 'जे' आणि 'के' पूर्णपणे बंद केले गेले आहे. सोबतच लोकांना केवळ सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल.
 
विवाहितांसाठी सवलत
परराष्ट्र मंत्रालयाने विवाहित लोकांसाठी पासपोर्ट काढणे सोपे केले आहे. आता अश्या लोकांना कुठलेही मॅरिज सर्टिफिकेट किंवा एनेक्सचर 'के' भरावे लागणार नाही.
 
अनाथ मुलांचे पासपोर्ट
अनाथ मुलांचे पासपोर्ट देखील सोप्या रित्या काढले जातील. त्यांना केवळ अनाथाश्रमाच्या अधिकृत लेटरहेडवर जन्म तिथीसाठी एक डिक्लेरेशन लिहिवावे लागतील.
 
विवाहाविना झालेले मुले
विवाह न करता जन्माला आलेले मुले देखील पासपोर्टसाठी आवेदन करू शकतात. अश्या मुलांना आवेदन करताना केवळ एनेक्सचर 'जी' द्यावे लागेल.
 
दत्तक मुले
अशा मुलांसाठी पूर्वी रजिस्टर्ड दत्तक घेतल्याची डीड द्यावी लागायची. आता केवळ लिहून द्यावं लागते की मुलं दत्तक घेतलेले आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही कागदाची गरज भासत नाही.
 
आयडी नसलेले सरकारी कर्मचारी
एखाद्या सरकारी कर्मचार्‍यांकडे आयडी कार्ड नसले तरी पासपोर्ट काढता येईल. अशा लोकांना केवळ एनेक्सचर 'एन' सामान्य कागदावर भरून द्यावं लागेल.
 
साधू-संन्यासी
साधू-संन्यासी देखील पासपोर्ट काढू शकतात. यासाठी त्यांना आई-वडिलांऐवजी आपल्या गुरुचे नाव द्यावं लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती