संगीत ऐकताच वयोवृद्ध व्यक्ती असो वा तरुण व्यक्ती असो सर्वांचेच पाय थिरकायला लागतात. कधी कधी तर प्राणीही संगीत ऐकल्यावर खूश होताना आपण बघितले आहे, परंतु हे अनोखे वृक्ष संगीत ऐकताच नृत्य करून लागतात, असे तुम्हाला कोणी म्हटले तर तुमचा विश्वास बसणार नाही ना? पण हे खरे आहे. 'टेलीग्राफ' असे या झाडाचे नाव असून याला सीनाफोर प्लांट असेही म्हटले जाते. हे झाड संगीत ऐकताच नाचू लागते. अशाप्रकारची झाडे तुम्हाला बांगलादेश, चीन, मलेशिया, पाकिस्तान आणि थायलंडमध्ये बघायला मिळतील. हे झाड औषधी गुणधर्मयुक्त आहे म्हणून याचा आयुर्वेदांतही उल्लेख केला आहे. संगीत लागताच हे झाड कसे नृत्य करू लागते, यावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे, परंतु अद्याप कोणालाही याचे उत्तर सापडले नाही.