अकाली मृत्यू केवळ चर्चा नव्हे तर बोधाचा विषय

सेलिब्रिटीची अकाली मृत्यू चर्चेचा विषय होता... मृत्यू झाल्यावर प्रत्येक क्षणाची माहिती, त्यावर अफवा, चर्चा सुरू होते. ही नैसर्गिक मृत्यू होती वा आत्महत्या की मर्डर. तर कोणी का आणि कशाला केले असेल. त्यामागील कारणं शोधली जातात. संपूर्ण इतिहास मांडण्यात येतो. नको त्या गोष्टी उघडकीस येतात ज्यातून काही खर्‍या तर काही निव्वळ अफवा ठरतात. मीडिया तर पदोपदीची माहिती सर्वप्रथम आमच्या चॅनलवर हे सांगून दोन-तीन दिवस हाच विषय रबराप्रमाणे खेच असते आणि आम्ही चहा-बिस्किट खात त्यांच्याकडून घेतलेले अपुरे ज्ञान इतर कोणालातरी वाटत बसतो. शेवटी काय... दिवस सरतात आणि चर्चा हळू-हळू दुसर्‍या विषयाकडे वळते. त्यातून आपल्या काय सापडतात.. टाइम पास.. तर मुळीच नाही. त्यातून खरंतरं खूप काही सकारात्मक घेण्यासारखं असतं.
 
श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर जेवढेही कारणं मांडण्यात येत आहे... त्यातून आम्ही ती नशेत होती किंवा ती तरुण दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करवत होती ज्याच्या विपरित परिणाम दिसून आला... वगैरे वगैरे.. आणि त्यावर आमचे ज्ञान... हे करणे तर अगदी चुकीचे आहे हे देण्याऐवजी... हा विचार करावा की तिला याचे परिणाम आपल्या सगळ्यापेक्षा कितीतरी स्पष्ट माहीत होते तरी तिच्यासाठी हीच प्राथमिकता असावी. यावरून आपली प्राथमिकता काय हे पण ठरवावे. पुरुषांसाठी सौंदर्य महत्त्वाचे म्हणून आपल्या जीवावर बेतले तरी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरून, पोटाला शिक्षा करून सुंदर दिसण्याची स्पर्धा ही आपली प्राथमिकता आहे का? किंवा लाइफस्टाइल म्हणून एकीकडे तासंतास जिममध्ये घालवणे आणि नंतर नशा करणे ही आपली गरज आहे का? हे प्रत्येकाने आपआपले ठरवावे.
 
खरं तर यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की आपल्या कोणत्या गोष्टीने समाधान होतोय. जरा एखाद्या सुंदर आणि जिरो फिगर दिसून समाधान वाटत असेल आणि त्यासाठी जी किंमत मोजावी लागत आहे ती कितपत योग्य आहे यावर विचार केलाच पाहिजे. तरी ही आपली इच्छा सगळ्या नकारात्मक पक्षांवर भारी वाटत असल्यास प्रत्येक व्यक्ती आपले निर्णय घेण्यासाठी मोकळा असतो. ताणमुक्त जीवन यशस्वी जीवनाची मूलभूत पायरी असावी आणि समाधान हे यश. आपल्या कामामुळे आपल्या मनाला समाधान मिळतंय का? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ते काम अगदी काहीही असून शकतं .. कोणत्याही क्षेत्रातील असू शकतं कारण यश मिळवण्यासाठी केवळ स्त्रीत्वाचा वापर करणे अगदी गरजेचं असतं असे नाही. आपल्या कौशल्य आणि गुणांमुळेही पुढे वाढता येतं. असं नसतं तर आजपर्यंत नाम कमावणार्‍या कित्येक स्त्रियांच्या सौंदर्यांकडे कधीच कोणाचे लक्ष गेले नाही कारण त्यांचा आत्मविश्वास त्याच्या चेहर्‍यावरील सौंदर्य म्हणून दिसून आले.
 
अर्थातच समाधानी जीवन हे कितीतरी महत्त्वाचे आहे हे समाधान प्रत्येकाने आपआपल्या परीने शोधायला हवे आणि त्यासाठी योग्य दिशेकडे वळावे. त्यासाठी जीवावर बेतून वरील सौंदर्याची गरज कधीच भासत नाही. केवळ आपला उद्देश्य स्पष्ट असावा आणि विश्वास कोणत्याही किमतीवर ढासळू द्यायचे नाही याची मानसिक तयारी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती