500 आणि 1000 ची खरी नोट अशी ओळखायची

1000 आणि 500 च्या नोटा खर्‍या आहेत का खोट्या हे ओळखाण्याचे सोपे टिप्स:
 
वॉटर मार्क
नोटांमध्ये महात्मा गांधीं यांच्या फोटोला हलक्या शेडमध्ये वॉटरमार्क बनवण्यात आले आहे. नोट तिरकी करून बघितल्यास हा वॉटर मार्क दिसेल.
 
आयडेंटिफिकेशन मार्क
हे मार्क वॉटर मार्कच्या डाव्या बाजूला असते. सर्व नोटांमध्ये हा मार्क वेगवेगळ्या आकारात असतो. जसे 20 रुपयाच्या नोटेमध्ये हा मार्क व्हर्टिकल रेक्टेंगल, 50 रुपयाच्या नोटेमध्ये फोरस्क्वेअर, 100 रुपयाच्या नोटेमध्ये ट्रेंगल, 500 रुपयाच्या नोटेमध्ये सर्कल आणि 1000 रुपयाच्या नोटेमध्ये डायमंड शेपमध्ये असतो.
लेटेंट इमेज
नोटवर गांधीजी यांच्या फोटोच्या बाजूला लेटेंट इमेज असते. नोटच्या किमतीची संख्या यावर लिहिलेली असते. नोट सरळ ठेवल्यावर ही दिसून येते.
 
मायक्रोलेटरिंग
लक्ष देऊन बघितल्यावर गांधीची यांच्या फोटोच्या बाजूला मायक्रोलेटर्समध्ये संख्या लिहिलेली दिसते. 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये या नोटांवर या जागेवर आरबीआय लिहिलेले असतं. याहून जास्त किंमतींच्या नोटांवर मायक्रोलेटरिंग केली जाते.
 
इंटेग्लिओ प्रिंटिंग
नोट छापण्यासाठी विशेष प्रकारची इंक वापरले जाते. ज्यामुळे नोटला स्पर्श केल्यावर महात्मा गांधींचा फोटो, आरबीआयची सील, प्रोमाइसिस क्लॉस, आरबीआय गवर्नरची स्वाक्षरी हाताला जाणवते.
 
सिक्युरिटी थ्रेड
नोटच्या मधोमध सरळ लाइनवर लक्ष देऊन बघितल्यास हिंदीत भारत आणि आरबीआय लिहिलेलं असतं. थ्रेड पातळ असून साधारणपणे दिसत नाही. लक्ष देऊन पाहिल्यास यावर लिहिलेलं स्पष्ट दिसतं.
 
ऑप्टिकल वेरिएबल इंक
या शाईचा वापर 1000 आणि 500 रुपय्यांच्या नोटमध्ये केला जातो. नोटमध्ये 500 आणि 1000 हे अंक प्रिंट करण्यासाठी ही शाई वापरण्यात येते. नोट सरळ पकडल्यास हे अंक हिरव्या रंगाचे दिसतात आणि एंगल बदल्यास याचा रंगही बदलत असतो.

वेबदुनिया वर वाचा