पहिला जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च 2010 रोजी साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून 20 मार्च हा दिवस 'जागतिक चिमणी दिन' म्हणून पाळला जातो. जगभरात चिमण्यांची संख्या कमी होत आहे. भारतात माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. पण बदलते वातावरण, वाढणारे प्रदुषण यांमुळे चिमण्यांना धोका निर्माण झाला आहे. म्हणून जागरूकता निर्माण करण्यसाठी 20 मार्च हा 'जागतिक चिमणी दिन' म्हणून साजरा करतात. एकूण 26 जातींच्या चिमण्यांची नोंद जगभरात आहे.