या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मोहन आंग्रे यांनी संमेलनाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार असून शहरातील मान्यवर साहित्यिक आमदार-खासदार, कार्यकर्ते यांनाही या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालिकेचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त अनिल विपत, वनिता मेकँझी, सुनील जाधव, प्राचर रुपश्री येवलेकर, शोभा पाडाळे आदी उपस्थित होते. परिषदेच्या पदाधिकार्यांनी संमेलनस्थळाची माहिती घेतली.
या संमेलनास राज्यातील जालना, औरंगाबाद, वसई, ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई आदी भागातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सेंट जोसेफ प्रशालेपासून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून लेझीम, बँड आदी पथकांचाही यामध्ये समावेश राहणार आहे.