थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन आणि स्टिङ्खन हॉकिन्स या दोघांचाही आयक्यू 160 एवढा होता. इंटेलिजन्स कोशन्ट अर्थात आयक्यू म्हणजेच बुद्ध्यांक असे म्हणतात. माणसाच्या बौद्धिक पातळीची क्षमता दर्शवणारं हे एक मापक आहे. सर्वसाधारणपणे माणसाचा आयक्यू 70 ते 130 या दरम्यान असतो. आयक्यू 130 च्या वर असणारी व्यक्ती जिनियस किंवा गॉड गिफ्टेड मानली जाते. अखिलेशचं प्राथमिक शिक्षण स्कॉटलंडमध्ये झालं आहे. पुस्तकांत रमणारा, मित्रांसह धमाल करणारा, प्रत्येक खेळाचा आनंद घेणार्या अखिलेशमध्ये नक्कीच काही तरी बात आहे, हे त्याच्या आई-वडिलांना त्याच्या बालपणीच कळलं होतं.