लग्नाअगोदर सेक्स, नो प्रॉब्लम..!

सेक्सबद्दल आणि महानगरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपच्या प्रयोगामुळे देशातील तरुण तरुणींचे विचार ही आता बदलत आहे. नुकत्याच एका संशोधनात असे आढळून आले की आता मुलींमध्ये वर्जिन हसबेंडची आवड कमी होत चालली आहे. याचप्रमाणे मुलांचे विचारदेखील वर्जिन बायकोला घेऊन बदल येत आहे.  
 
मोठ्या शहरांमध्ये स्थिती अशी झाली आहे की लग्नाअगोदर सेक्स संबंधांना 'काही मोठी गोष्ट नाही' असे म्हणणे सुरू केले आहे. याचा अर्थ असा आहे की सेक्सबद्दल तरुणांचा दृष्टीकोण पूर्णपणे बदलत आहे. सर्वेक्षणात वेग वेगळ्या शहरांच्या मुलींना एकच प्रश्न विचारण्यात आला. तो असा की, त्यांना वर्जिन हसबेंड हवा आहे? या प्रश्नावर जे उत्तर समोर आले, ते बरेच काही विचार करण्यासारखे ठरले.  
 
तसं तर बर्‍याच मुलींनी म्हटले की त्यांना असा नवरा हवा आहे, ज्याच्याजवळ आधीपासून कुठल्याही प्रकारचा सेक्स संबंधी अनुभव नसायला पाहिजे. पण बर्‍याच मुलींचे उत्तर एकदम आश्चर्यकारक होते आणि ते भारतीय संदर्भात अप्रत्याशितपण होते. यातून बर्‍याच मुलींचे म्हणणे होते की आता त्या वर्जिन नवर्‍याबद्दल विचार करत नाही, कारण त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे की आज जग किती पुढे गेले आहे. लग्न होईपर्यंत आता प्रत्येकात इतका धीर नसतो, त्याचे परिणाम म्हणून लग्नाआधी सेक्स मोठ्या शहरांमध्ये आता सामान्य बाब होत आहे. लिव्ह-इनचे चलन देखील दिवसोंदिवस वाढत आहे.   
 
याबद्दल मुलांचे मत देखील काही वेगळे नव्हते. एका मुलाचे म्हणणे होते की त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नाही की होणारी बायको वर्जिन आहे की नाही. एकाने हे ही म्हटले की मुली असो किंवा मुलं दोघांना आपले निर्णय घेण्याचा हक्क आहे.   
 
अशात जर एखादा वयस्क लग्नाअगोदर आपल्या मर्जीने कुणाशी सेक्सुअल रिलेशन निर्माण करतो, तर त्यात काहीही चुकीचे नसते. तसेच वर्जिनिटी (कौमार्य) लग्नासाठी कुठलीही शर्त नसते. आता ते दिवस राहिलेले नाही की लग्नाअगोदर मुलीचे व‍‍‍र्ज‍िन होणे, तिच्या यौन शुचिताचे प्रमाण मानले जात होते. पण आता मुलं किंवा मुलींना अशा कुठल्याही सर्टिफिकेटची गरज उरलेली नाही.  

वेबदुनिया वर वाचा