कुठलेही आई-वडील आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी प्राणाची आहुती द्यायलाही तयार असतात. जसं हे माणसांमध्ये असतं, तसंच मुक्या प्राण्यांमध्येही. मुके प्राणीही आपल्या पिल्लांना संकटकाळी वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न करत असतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे.
एका सशाने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता सापाशी दोन हात केले. सशाच्या पिल्लाला एकटं पाहून साप त्याच्याजवळ गेला. मात्र, ज्यावेळी ससा परतला, तेव्हा त्याने पिल्लाजवळ सापाला पाहिले.. आणि मग सुरु झाली पिल्लाच्या बचावाची लढाई.